बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर

लखनऊ | उत्तर प्रदेश सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीपुर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्विटरवरुन बाॅंबने उडवून जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. यामुळे पोलिसांची भलतीच तारांबळ उडालेली होती. ‘लेडी डॉन’ या नावाने ट्विटर अकाऊंटवरुन 4 फेब्रुवारी रोजी ट्विट करण्यात आले. यातून योगी आदित्यनाथ यांना प्राणघातक हल्याची धमकी देण्यात आली होती.

याप्रकरणी गोरखपुर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव सोनू असून तो फिरोजाबाद येथे राहातो. सोनूला महिनाभर आग्रा तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर गोरखपूरच्या पोलिसांनी त्याला वॉरंट ‘बी’ अंतर्गत अटक करून गोरखुपर येथे आणले. न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली.

याप्रकरणी धक्कादायक बाब म्हणजे ट्विट करणाऱ्याने या ट्विटमध्ये हापूर पोलिसांना टॅग केले होते. याच अकाऊंटवरुन यापुर्वी मेरठ आणि लखनऊमध्ये बाॅंबस्फोट घडविण्याच्या धमक्या आल्या होत्या. यानंतर निगराणी पथक या आरोपीच्या शोधात गुंतले होते.

दरम्यान, ट्विटमध्ये असदुद्दीन ओवेसी हे प्यादे आहेत, खरे लक्ष्य योगी आदित्यनाथ आहेत, भाजप नेत्यांच्या गाड्यांवर आरडीएक्सने हल्ला करणार, तुमची टीम कामाला लावा. दिल्ली पाहू नका. असे लिहिले होते.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ नॉट रिचेबल

“तुम्ही आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे 36 आमदार नेले, आता कसं वाटतंय?”

“…त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचा फायदा घेत स्वार्थ साधला”

“बेताल वक्तव्य करणारे कोण हे सर्वांनाच माहिती, इथे धमकीला कोणी घाबरत नाही”

उद्धव ठाकरेंना काळजी नाही कारण त्यांना माहितीये ‘त्यावेळी’ इंदिरा गांधी अजिंक्य राहिल्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More