UP Election Result 2022: निकालापूर्वी अखिलेश यादव याचं ट्विट चर्चेत
नवी दिल्ली | पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या (UP Election Result 2022) निकालादम्यान समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ट्विट केलं आहे. अखिलेश यादव यांनी केलेलं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.
मतमोजणी केंद्रावर लक्ष ठेवण्याचे आदेश अखिलेश यादव यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. ईव्हीएमवर लक्ष ठेवून असल्याने अखिलेश यादव यांनी सपा कार्यकर्त्याचे आभार मानले आहेत. तर आता निर्णयाची वेळ आली असल्याचंही अखिलेश यादव यांनी ट्विट करत लिहिलं आहे.
इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, अब वक्त आ गाया है फ़ैसलों का. मतमोजणी केंद्रावर रात्रंदिवस जागरूकपणे कार्यरत राहिल्याबद्दल सपा गठबंधनच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, समर्थकांचे, नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार. लोकशाहीचे शिपाई विजयाचं प्रमाणपत्रच घेऊन पोहोचले, असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात भाजप (BJP) आणि समाजवादी पक्षात थेट लढत पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या टप्प्यात उत्तर प्रदेशात भाजप 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे तर समाजवादी पक्ष 80 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशला मिनी लोकसभा म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे उत्तर प्रदेशातून येणाऱ्या निकालावर संपूर्ण देशाचं लक्ष आहे.
इम्तिहान बाकी है अभी हौसलों का
वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ कामतगणना केंद्रों पर दिन-रात सतर्क और सचेत रूप से सक्रिय रहने के लिए सपा-गठबंधन के हर एक कार्यकर्ता, समर्थक, नेतागण, पदाधिकारी और शुभचितंक को हृदय से धन्यवाद!
‘लोकतंत्र के सिपाही’ जीत का प्रमाणपत्र लेकर ही लौटें!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) March 10, 2022
थोडक्यात बातम्या-
युद्ध सुरू असतानाच रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा!
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर
रशिया युक्रेनवर ‘हा’ मोठा हल्ला करण्याच्या तयारीत?, अमेरिकेने दिला सतर्कतेचा इशारा
भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत, गोव्यात मुख्यमंत्री कोणाचा?
कुणाला मिळणार जनतेचा कौल?; 5 राज्यांचं भवितव्य ठरणार
Comments are closed.