बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्मशानभूमीत रांगा अन् फुटपाथवरच पेटल्या चिता; ‘या’ शहरातील व्हिडिओनं हाहाकार, पाहा Video

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात हाहाकार माजवल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील आकडेवारी धक्कादायक असली तरी उत्तरेकडील राज्यांमध्येही अशीच परिस्थिती आहे, मात्र प्रशासन कोरोनाग्रस्तांचे आकडे दाबून ठेवत असल्याचा आरोप होत आहे. असाच धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये पहायला मिळत आहे.

प्रशासनाच्या अधिकृत आकडेवारीनूसार गाझियाबादमध्ये एप्रिल २०२१ मध्ये कोरोनामुळे फक्त २ लोकांना मृत्यू झाल्याची नोंद आहे, मात्र प्रशासन सांगत असलेली आकडेवारी आणि जमिनीवरील परिस्थितीत यामध्ये मोठं अंतर असल्याचं समोर आलं आहे. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनूसार गाझियाबादमध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.

गाझियाबादमध्ये कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू होत असल्याचा दावा केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना स्मशानभूमीमध्ये जागा मिळत नाहीये, त्यामुळे फुटपाथवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ मृतांच्या नातेवाईकांवर आली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाईन लावून वाट पाहावी लागत आहे. यासंदर्भात गाझियाबादमधील हिंडन स्मशानभूमीतील काही फोटो तसेच व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये मृतदेहांना स्मशानभूमीबाहेरील फुटपाथवर रांगेनं झोपवण्यात आलं आहे आणि मृतांचे नातेवाईक आपला नंबर केव्हा येईल याची वाट पाहताना दिसत आहेत.

उत्तर प्रदेशात कोरोना विषाणूचा प्रभाव चांगलाच वाढत असल्याचं चित्र आहे. लखनऊ, प्रयागराज, वाराणसी, कानपूर ही राज्यातील महत्त्वाची शहरं कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे सर्वाधिक त्रस्त आहेत. 1 एप्रिल रोजी राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेली 2600 प्रकरणे होती, ती 19 एप्रिल रोजी 28,237 पर्यंत वाढली आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 208523 इतकी आहे.

दरम्यान, गाझियाबादमधील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूच्या वेळेत आता बदल करण्यात आला आहे. रात्रीचा कर्फ्यू रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत लागू करण्यात आला आहे. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे नाईट कर्फ्यूच्या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रभाव असल्याचं चित्र आहे, मात्र उत्तरेकडील राज्यं कोरोनाग्रस्तांची खरी आकडेवारी लपवत असल्याचा आरोप आता केला जात आहे. कोरोनाग्रस्त एवढ्या कमी प्रमाणात सापडत आहेत मग स्मशानाबाहेर मृतदेहांच्या एवढ्या रांगा का लागत आहेत. तसेच लोकांना फुटपाथवर आपल्या जिवलगांना शेवटचा अग्नी देण्याची वेळ का आली आहे?, असा सवाल आता विचारला जात आहे.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा फुटपाथवर लोकांवर अंत्यसंस्कार सुरु असल्याचा व्हिडीओ काळजाचा थरकाप उडवणारा आहे. गाझियाबादच्या एका रस्त्याच्या कडेला एकाशेजारी एक काही अंतर राखून सरणं रचलेली या व्हिडीओत पहायला मिळत आहेत.

नातेवाईक रस्त्याच्या कडेला असल्याचा या सरणांवरील आपल्या आप्तांना शेवटचा निरोप देत आहेत. स्मशानभूमीत जागा नसल्याने अशाप्रकारे फुटपाथवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.

रस्त्याच्या कडेला असलेल्या या चिता पेट घेताना तिथं त्यांचे नातेवाईकही दिसून येत आहे. अशाप्रकारे आपल्या प्रियजनांना शेवटचा अग्नीही स्मशानभूमीत मिळत नसल्याचं दुःख त्यांना आहे. कोरोनामुळे परिस्थिती फारच वाईट बनली आहे, मात्र अशाप्रकारे अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत असल्यानं परिसरात हळहळ देखील व्यक्त केली जात आहे.

माध्यमांनी या प्रकरणाचं वृत्तांकन केल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गाझियाबादमध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका देखील होऊ लागली आहे.

खाली पाहा उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील दोन धक्कादायक व्हिडीओ- १) स्मशानभूमीबाहेर मृतदेहांची रांग… २) फुटपाथवरच मृतदेहांना शेवटचा अग्नी…

व्हिडीओ पहिला- स्मशानभूमीबाहेर मृतदेहांची रांग

 

व्हिडीओ दुसरा- फुटपाथवरच मृतदेहांना अग्नी

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षा रद्द, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण

15 वर्षीय मुलीनं गळफास घेऊन संपवलं जीवन, कारण अत्यंत क्षुल्लक

मेव्हणीवर वारंवार बलात्कार, व्हिडीओ बनवला अन्… अत्यंत धक्कादायक घटना

कामावरुन काढून टाकायला सुरुवात; पुण्यातील ‘या’ बड्या कंपनीनं 1419 कामगारांना काढलं!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More