सरकार नवविवाहितांना ‘कंडोम’ आणि ‘गर्भनिरोधक गोळ्या’ देणार!

लखनऊ | उत्तर प्रदेश सरकारने नवविवाहित जोडप्यांना ‘शगुण’ म्हणून कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिनी या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे.

कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या यासोबत एक पत्र नवविवाहित जोडप्यांना दिलं जाणार आहे. कुटुंबनियोजनाचे फायदे या पत्रातून संबंधित जोडप्याला समजावून दिले जातील.

राज्यातील विविध भागातील आशा स्वयंसेवकांतर्फे हा शगुण दिला जाईल. परिवार विकास योजनेचे प्रमुख अविनाश सक्सेना यांनी याबाबत माहिती दिली.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या