कोरेगावनंतर उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये भडकला हिंसाचार

लखनऊ | कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या जखमा मिटत नाहीत तोच उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये हिंसाचार उसळलाय. यामध्ये एका युवकाचा मृत्यू झालाय. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त निघालेल्या बाईक रॅलीवर दगडफेक करण्यात आली आणि त्यानंतर दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या गोळीबारात 3 तरुण जखमी झाले होते, पैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 

सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिसरात तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप 60 जणांना अटक केलीय. दरम्यान, मृत तरुणाला शहीदाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात येतेय.