बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलिसांनी भाजपच्या माजी महिला खासदाराला केस ओढत धक्के देत गाडीत ढकललं, पाहा व्हिडीओ

उत्तरप्रदेश | लखीमपूर हिंसाचारानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच सोशल मीडियावर अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लखीमपूर हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या भाजपच्या माजी महिला खासदाराला यूपी पोलिसांनी केस ओढत, धक्के मारत गाडीत ढकलल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. सोशल मीडियावर उत्तरप्रदेश पोलिसांच्या या गैरवर्तनावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

भाजपच्या माजी खासदार सावित्रीबाई फुले या लखीमपूर हिंसाचारात मृ्त्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेताना चुकीची वागणूक दिली. पोलिसांनी सावित्रीबाई यांचे केस ओढत धक्के मारत पोलिस गाडीत ढकलून दिल्याचं समोर आलंय. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यूपी पोलिसांवर जोरदार टिका केली जात आहे.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनाही यापुर्वी यूपी पोलिसांनी धक्काबुक्की करून अटक केली होती. त्या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेल्या होत्या. त्यानंतर आता सावित्रीबाई फुले यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनामुळे यूपी पोलिसांवर टिका होतेय. प्रियंका गांधी यांनी व्हिडीओ रिट्वीट करत “सावित्री तुमच्यासोबतचं हे वर्तन पाहून दुख: झाले. लढत राहा, कणखर राहा” असं लिहीलं आहे.

सावित्रीबाई यांनी 2012 साली खासदार म्हणून संसदेत पहिलं पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर 2018 साली भाजप हा समाजात फूट पाडणारा पक्ष आहे असं म्हणत भाजप सोडला होता. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि वर्षभरातच त्या काँग्रेस पक्षात आपला आवाज ऐकला जात नसल्याचे म्हणत काँग्रेसमधूनही बाहेर पडल्या. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी कांशिराम बहुजन पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.

पाहा व्हिडीओ – 

 

 

थोडक्यात बातम्या- 

अजब करिअरची गजब कहाणी, लग्नात करवली बनून तरुणी कमावते लाखो रुपये!

प्रियंका गांधींच्या अटकेने आव्हाडांना झाली इंदिरा गांधींची आठवण, म्हणाले…

“मारा, गाडा काहीही करा, पण शेतकऱ्यांचा मुद्दा लावूनच ठरणार”

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचं आत्महत्या सत्र सुरूच; आता ‘ही’ घटना आली समोर

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महिलेने वाटेतच दिला बाळाला जन्म आणि दुर्देवाने व्हायला नको तेच झालं…

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More