बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, मी ‘त्या’ नेत्यांसारखा नाही जे…”

लखनऊ | आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात आरोप प्रत्यारोपाला उधाण आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) आणि सपा नेता अखिलेश यादव (Akhilesh yadav) यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. अशातच भाजपने आपले दिग्गज नेते प्रचारासाठी उतरवले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशच्या जनतेला मोठं आश्वासन दिलं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात 1,123 कोटींच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली आहे. त्यामुळे आता पुढील 5 वर्षात उत्तर प्रदेशातील रस्ते युरोपीयन नाही तर अमेरिकेसारखे बनवले जातील, असं नितीन गडकरींनी कार्यक्रमात वक्तव्य केलं आहे. माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले आहेत.

माझ्याकडे असं मंत्रालय आहे की, जिथं पैश्यांची कमतरता नाही. राज्य मागताना थकतील पण आपण देताना थकणार नाही. तुम्ही पुन्हा एकदा उत्त प्रदेशात सत्ता बनवा मी तुम्हाला 5 लाख कोटींची कामं करून देतो, असं आश्वासन देखईल गडकरींनी दिलं आहे.

दरम्यान, मी त्या नेत्यांपैकी नाही जे पोकळ आश्वासनं देतात. गेल्या वर्षात जे मी बोललो ती सर्व कामे पूर्ण केलीत, असंही गडकरी यावेळी म्हणाले आहेत. मी एक शेतकरी आहे माझं आयुष्य हे शेतकऱ्यांसाठी समर्प्रित आहे, असंही गडकरी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“स्वत:ला मोठा नेता म्हणे, तुम्ही सव्वाशेर नाही आता पावशेर झालात”

“माझे 30-35 आमदार होऊ द्या, 10 मिनिटात गंमत करून दाखवतो”

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ ठिकाणी उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक

भारतीयांसाठी धोक्याची घंटा! लसीकरण झालेल्या लोकांना ओमिक्राॅनचा धोका

“त्यांचं वाटोळं करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More