Government job | लेखी परिक्षेशिवाय मिळणार 2 लाखांपर्यंतची सरकारी नोकरी!

नवी दिल्ली | नोकरी (Job) मिळवण्यासाठी सर्वात आधी त्या कंपनीला मेल करावा लागतो. कंपनीच्या एचआरचा(HR) काॅल येऊ पर्यंत थांबावं लागतं. त्यानंतर मुलाखतीचे राऊंड होतात मग तुमची नोकरी पक्की होते. ही सगळी प्रोसेस केल्यानंतर एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी आपल्याला लागते.

यासगळ्या ऐवजी walk in Interview चा पर्याय अनेकांना योग्य वाटतो. त्यातच सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी PSU मध्ये भरती निघाली आहे. सार्वजनिक क्षेत्राचा ( public sector) उपक्रम भारतातील स्टील प्राधिकरण, SAIL चे भिलाई युनिट GDMO, विशेषज्ञ आणि इतर पदांसाठी भरती निघाली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परिक्षा नसणार आहे.

या पदांसाठी केवळ वाॅक इन (walk in Interview) इंटरव्ह्यूद्वारे भरती केली जाणार आहे. 6 फेब्रुवारी 2023 ला हा वाॅक इन इंटरव्ह्यू सकाळी 9.30 च्या सुमारास असणार आहे. पदांसाठी लागणाऱ्या सगळ्या कागदपत्रासोबत हजर राहणं गरजेचं आहे. ही मुलाखत मानव संसाधन विकास केंद्र, भिलाई येथे असणार आहे.

ज्या पदांसाठी भरती होणार आहे त्याची शैक्षणिक पात्रता सांगण्यात आली आहे. एमबीबीएस (MBBS) ते डीएम आणि डीएनबी यांसारख्या पदव्या उमेदवाराकडं असणं गरजेचं आहे. 2,50,000 इतका पगार सुपर स्पेशालिस्ट या पदासाठी मिळणार आहे. 1,20,000 विशेषज्ञ तर जीडीएमओ या पदासाठी 90,000 रुपये पगार असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More