Top News देश

योगी सरकार काय लपवतंय?; माध्यमांना हाथरसबाहेर रोखलं!

Photo- ABP News

लखनऊ | हाथरस घटनेप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात असताना योगी सरकार काही लपवतंय का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे, कारण हाथरस घटनेचं वार्तांकन करण्यापासून माध्यमांना रोखलं जात आहे.

हाथरसमधील परिस्थिती जाणून घेण्याचा तसेच पीडित कुटुंबाच्या वेदना समजून घेण्याचा माध्यमांचा प्रयत्न होता, मात्र कोणत्याही माध्यमाच्या प्रतिनिधीला हाथरसमध्ये पाऊल ठेवू दिलं जात नाहीये.

गावाच्या बाहेर पोलिसांची फौज तैनात करण्यात आलेली आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी आडमार्गाने जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पकडून पुन्हा गावाबाहेर सोडलं जात आहे. एसआयटीची चौकशी सुरु असल्याचं कारण यामागे दिलं जात आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी पीडित कुटुंबाला धमकावत असल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. पीडित कुटुंब पोलिसांच्या नजरकैदेत असल्याची देखील माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश

“भाजप सरकार सत्तेच्या मस्तीत, ते कधी कोसळतील हे त्यांनाही कळणार नाही”

ठाण्यात हिरानंदानी इस्टेट येथील सहा दुकानांना आग!

…याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही- संजय राऊत

‘मुलगी कोरोनाने मेली असती तर…’; हाथरसच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांचं धक्कादायक वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या