Upcoming EVs l देशात इलेक्ट्रिक वाहनांबाबत लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. बऱ्याच इलेक्ट्रिक कारने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे आणि आगामी काळात आणखी बरीच वाहने बाजारात येण्यास सज्ज आहेत. जून-जुलै महिन्यात अनेक ब्रँडेड इलेक्ट्रिक कार लाँच होऊ शकतात. या कारच्या यादीत टाटा मोटर्सपासून व्होल्वोपर्यंतच्या मॉडेल्सचा समावेश आहे.
जून महिन्यात या कार धुमाकूळ घालणार :
Volvo EX90 :
Volvo EX90 या महिन्यात 15 जून रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच होण्याची शक्यता आहे. ही एक प्रीमियम 7-सीटर एसयूव्ही कार आहे. ही कार अवघ्या 4.7 सेकंदात 0 ते 60 mph पर्यंत वेग पकडू शकते. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जिंगमध्ये 300 मैल अंतर कापण्यास सक्षम असेल. या कारची बॅटरी 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतील. व्होल्वोच्या या प्रीमियम लक्झरी कारची किंमत सुमारे 1.50 कोटी रुपये असू शकते.
Mini Cooper SE 2024 :
Mini Cooper SE ही 4-सीटर कार आहे. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जिंगमध्ये 234 ते 250 मैल अंतर कापण्याचा दावा करते. या कारच्या स्पीडबद्दल बोलायचे झाले तर ही EV फक्त 6.7 सेकंदात 0 ते 62 mph पर्यंत वेग पकडू शकते. ही कार 20 जूनच्या आसपास भारतीय बाजारात लॉन्च होऊ शकते. Mini Cooper SE ची किंमत सुमारे 55 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
Upcoming EVs l लवकरच बजेट-फ्रेंडली इलेक्ट्रिक कार बाजारात येणार :
BYD Seagull :
BYD Seagull ही एक बजेट-फ्रेंडली इलेक्ट्रिक कार असणार आहे. ही कार 10 लाख रुपयांच्या श्रेणीत भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकते. BYD Seagull सिंगल चार्जिंगवर 300 किलोमीटर ते 380 किलोमीटरची रेंज देईल. फास्ट चार्जिंगच्या मदतीने ही कार सहज चार्ज करता येते. मात्र या कारची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नाही.
Tata Curvv EV :
Tata Motors च्या Curve EV बद्दल बरीच चर्चा आहे. टाटाची ही इलेक्ट्रिक कार 16 जुलैच्या आसपास बाजारात येऊ शकते. या कारची किंमत सुमारे 20 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही कार एका चार्जिंगमध्ये 450 किलोमीटर ते 500 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. इलेक्ट्रिक कार लाँच झाल्यानंतर या कारचे पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटही येण्याची शक्यता आहे. Tata Motors आधीच इलेक्ट्रिक कार बाजारात उपस्थित आहे, ज्यात Nexon EV आणि पंच EV च्या नावांचा समावेश आहे.
News Title : Upcoming EVs In India
महत्त्वाच्या बातम्या-
महायुतीत असलो तरी शरद पवारांची विचारधारा सोडणार नाही; अजितदादा भावूक
राज्यातील विद्यार्थ्यांचा गणवेश ठरला! असा असणार शालेय गणवेश; वाचा संपूर्ण नियमावली
धो-धो पाऊस कोसळणार; राज्यातील या जिल्ह्यांना रेड व यलो अलर्ट जारी
या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ होणार
मोठी बातमी! मुरलीधर मोहोळांना मिळालं ‘हे’ महत्त्वाचं खातं