बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई-पुण्यातील ही गोष्ट आता कोल्हापुरातही, उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा!

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्याच्या कागलमध्ये अन्नपुर्णा शुगर आणि गुळ प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उद्याेग मंत्री सुभाष देसाई यांनी मोठी घोषणा करून कोल्हापूरकरांना आनंदाचा सुखद धक्का दिला आहे. मुंबई-पुण्याप्रमाणेच आता कोल्हापुरातही आयटी पार्क उभे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोल्हापूरला छञपती शाहु महाराजांमुळे उद्योगाचा वारसा आहे, हाच वारसा पुढे चालु ठेवण्यासाठी राज्य सरकार सतत प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले. पुण्यातील हिंजवडीप्रमाणेच कोल्हापूरजवळ शंभर एकर जागेमध्ये हे आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये तयार होणाऱ्या मालाचा दर्जा उत्तम असतो आणि त्यामुळेच परदेशातही इथल्या मालाला मोठी मागणी असते, याचाच फायदा येथील उद्योजकांना होईल असेही मंञ्यांनी बोलून दाखवले आहे.

यासाठी लागणारी जागा हातकणंगले तालुक्यातील संभापूर, कासारवाडी शिवारातील जमीन मालक देण्यासाठी तयार असून, 250 एकरपेक्षा अधिक जागेवर मोठे शहर भविष्यात नियोजित असल्याचं आणि त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या लवकरात लवकर राज्य सरकारने मंजुर कराव्या, असे निवेदन खासदार धैर्यशील माने यांनी उद्योगमंञी सुभाष देसाई यांना दिले आहे.

संबधित आयटी पार्क हा नेमका कुठे होणार? याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नसली तरी, स्थानिक उद्योजकांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले आहे.

थोडक्यात बातम्या-

शेतकऱ्यांनो सावधान… राज्याच्या ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता!

“मंत्री झाल्यावर मला कळालं, की त्यासाठी फार अक्कल लागत नाही”

गोपिचंद पडळकर अधिकच आक्रमक; अजित पवारांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट!

साताऱ्यातील पोरींमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचं खरं कारण आलं समोर, पाहा व्हिडीओ

आंदोलनजीवी! शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुण्यात मिटअपचं आयोजन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More