‘या’ प्रोसेसद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये 5G अपडेट करा

मुंबई| काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते भारतात 5G सेवा लाॅंच करण्यात आली आहे. परंतु ही सेवा सुरूवातीला काही शहरांमध्येच सुरू करण्यात आली होती. परंतु अजूनही तुमच्या मोबाईलमध्ये ही सेवा सुरू झाली नसेल तर तुम्ही काय करू शकता याची माहिती घेऊयात.

5G सेवा सुरू करण्यासाठी तुमच्याकडं 5G ला सपोर्ट करणारं iphone माॅडेल असावे लागते. 5G सेवेसाठी तुम्ही जीओ(Jio) किंवा एअरटेलचे(Airtel) सीमकार्ड वापरू शकता. जर तुमच्याकडं iphone 12 किंवा नंतरचे माॅडेल असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

5G सेवा सुरू करण्यासाठी तुमच्या iphone सेटिंग्जमध्ये जावा. यानंतर तुम्हाला जनरल सेटिंग्जवर जाऊन साॅफ्टवेअर अपडेटवर टॅप करावं लागेल. जर तुमच्या iphone साठी iOS 16.2 चालू झालं असेल तर तुम्हाला तिथं डाउनलोड असा ऑप्शन दिसेल.

यानंतर तुमच्या iphone वर काही नियम आणि अटी दिसतील. त्या तुम्ही व्यवस्थित वाचा. यानंतर तुमच्या आयफोनवर अपडेट डाउनलोड करा. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तिथं 5G स्टेटस असा पर्याय मिळेल.

जर वरील प्रोसेस केल्यानंतही तुम्हाला 5G स्टेटस मिळाले नाही तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सिम सेटिंग्जमध्ये जाऊन 5G नेटवर्क चालू करावे. यानंतर तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येईल.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More