मोदी-शहांचं टेंशन वाढलं; केंद्रीय मंत्री उद्या ‘एनडीए’तून बाहेर पडणार???

मोदी-शहांचं टेंशन वाढलं; केंद्रीय मंत्री उद्या ‘एनडीए’तून बाहेर पडणार???

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह भाजपवर नाराज आहेत. उद्या मोतिहारीमध्ये होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते एनडीएसोबत रहायचं की नाही याचा निर्णय घेणार आहेत. 

कुशवाह राष्ट्रीय लोक समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरुन त्यांचा भाजपसोबत तिढा आहे. 

कुशवाह यांच्या पक्षाला लोकसभेच्या 3 जागा हव्या आहेत. तर भाजप मात्र 2 जागा देण्यावर अडून आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण झालं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना भेटीसाठी वेळ दिली नाही त्यामुळे ते नाराज आहेत. उद्या ते भाजपप्रणित एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा करतील, असा राजकीय पंडितांचा अंदाज आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-फोर्ब्ज इंडियाची यादी जाहीर; पहा कोण आहे सर्वात श्रीमंत भारतीय…

-नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत; पाहा कुणी केली भविष्यवाणी…

-राजस्थानच्या निकालाबद्दल रामदास आठवलेंचं भाकीत, पाहा काय म्हणाले…

-पालकमंत्री दाखवा अन् हजार रुपये मिळवा; बुलडाण्यातील अजब प्रकार

-आता मी बघतो किती लोक वाचतात; नरेंद्र मोदींचा गांधी परिवाराला इशारा

Google+ Linkedin