बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खरंतर कोणतीही वाढ झालेली नाही”

लखनऊ | उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील क्रीडा व युवा कल्याण मंत्री उपेंद्र तिवारी यांनी अजब तर्क माडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खरंतर कोणतीही वाढ झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील उरई येथील एका कार्यक्रमात उपेंद्र तिवारी बोलत होते.

देशातील 95 टक्के जनता पेट्रोल आणि डिझेलचा वापरच करत नाही, असं वक्तव्य उपेंद्र तिवारी यांनी केलं आहे. राज्यातील बेरोजगारीच्या प्रश्नावर तिवारी यांना विचारण्यात आला असता त्यांनी आमच्या कार्यकाळात जो व्यक्त मेहनतीनं परीक्षा उत्तीर्ण करेल फक्त तोच अधिकारी बनू शकतो, असं म्हटलं आहे.

जनता पेट्रोल आणि डिझेलचा वापरच करत नाही. फक्त मुठभर लोक पेट्रोल आणि डिझेल वापरतात. असं असलं तरी अजूनही इंधनाच्या किमतीत वाढ झालेली नाही, असं ते म्हणाले.

देशात नागरिकांना 100 कोटींहून अधिक कोरोना विरोधी लसीचे डोस देण्यात आले आहेत. आपण जर इंधनाच्या किंमतीची देशातील प्रत्येक नागरिकांच्या उत्पन्न क्षमतेशी तुलना केली तर सध्याच्या इंधनाच्या किमती अजूनही कमीच आहेत असं लक्षात येईल, असंही ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

देशसेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल- समीर वानखेडे

महाराष्ट्र हादरला! एकाच जिल्ह्यात दोन दिवसात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

‘नरेंद्र मोदींच्या भीतीच्या 35 हजार उद्योजकांनी देश सोडला’; अर्थमंत्र्यांची टीका

लहान मुलांच्या लसीकरणानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे; तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

‘भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानला जास्त संधी’; मुल्तानच्या सुल्तानचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More