UPI Payments | सध्याच्या युगात कॅश व्यवहारांपेक्षा ऑनलाइन व्यवहारांना अधिक प्राधान्य दिलं जातं. मोबाइलवरून एका झटक्यात कुठेही आणि कुणालाही पैसे पाठवता येतात. मात्र, बऱ्याचदा असं होतं की, घाई गरबडीत आपण चुकून (UPI Payments) दुसऱ्याच नंबरवर पैसे ट्रान्सफर करतो.
अशावेळी मग चुकीच्या नंबरवर पाठवलेले पैसे परत मिळणार की नाही, आणि ते कसे मिळवायचे याबाबत बऱ्याच जणांना माहीत नसते. एखाद्या वेळेस रक्कम मोठी असेल तर मग मोठा फटका बसू शकतो. मात्र, तुमच्याकडून जर कधी असं काही झालं तर घाबरून जाऊ नका. कारण, तुम्ही तुमचे पैसे परत प्राप्त करू शकता. आता ते नेमकं कसं?, तर या लेखात याबाबत माहिती दिली आहे.
रक्कम परत मिळवण्याच्या टिप्स
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, ऑनलाइन व्यवहारानंतर तुमचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेल्यास, तुम्ही त्वरित कारवाई करावी. RBI च्या टोल-फ्री क्रमांक 18001201740 वर तक्रार दाखल करून तुम्ही आपली समस्या सांगू शकता.
यानंतर जराही वेळेचा व्यत्यय न करता लगेच (UPI Payments) बँकेत जा. बँकेत जाऊन चुकीच्या व्यवहारांबाबत माहिती द्या आणि व्यवहार संदर्भ क्रमांक, तारीख, रक्कम आणि प्राप्तकर्त्याच्या खात्याच्या तपशीलांसह औपचारिक तक्रार फॉर्म भरा.
तीन दिवसांच्या आत तक्रार करा
आरबीआयच्या नियमांनुसार, बँकेला याबाबत लगेच चौकशी करण्याचे निर्देश आहेत. तसेच पडताळणीच्या 48 तासांच्या आत रोकड परत करणे आवश्यक असते. तसेच बँकेने जर तुमची समस्या फेटाळली किंवा बँक काहीही मदत करू शकली नाही तर, ग्राहक RBI च्या अधिकृत वेबसाइट (http://bankingombudsman.rbi.org.in) द्वारे तक्रार दाखल करू शकता.
तसेच, चुकीच्या खात्यात पैसे गेल्यानंतर ग्राहकाला 3 दिवसांच्या आता तक्रार करणे आवश्यक असते. यामुळे लवकरात लवकर तुमची अडचण दूर होईल आणि तुम्हाला तुमचे पैसे लवकर (UPI Payments) मिळतील.
News Title – UPI Payments to wrong address know the process
महत्त्वाच्या बातम्या-
हायकोर्टाचा राज्य सरकारला मोठा दणका; RTE प्रवेशाबाबतचा ‘तो’ अध्यादेश रद्द
लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली लाडक्या भावाचा छुपा प्रचार!
‘या’ भागात पावसाचा हाहाकार; शाळेतील 120 विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकली
सर्वसामान्यांना दणका! टोमॅटोचे दर गगनाला भिडले, एक किलोचा भाव तब्बल ‘इतके’ रुपये