बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मन सुन्न करणारी घटना! भावाच्या निधनाचं वृत्त कळताच छोट्या भावानेही जीव सोडला, अन्…

वाशिम | वाशिममध्ये एक सुन्न करणारी घटना घडली आहे. मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेत असलेल्या मोठ्या भावाच्या निधनाचे वृत्त कळताच लहान भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण गाव शोकमग्न झालं आहे.

जनार्दन सीताराम पवार हे मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर वर्धा येथील सावंगी मेघेच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र रविवार 27 जूनला त्यांचे निधन झाले. जनार्दन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव घरी आणले. मात्र ते पाहूनच त्यांचे लहान बंधू मुरलीधर सीताराम यांना हृदयविकाराचा झटका आला.

या दोन भावांचे प्रेम पाहून गावातील धनुर्धर लक्ष्मण कोल्हे हेही भारावले. या दोघांचे अंत्यसंस्कार पार पाडून जनार्दन पवार घरी परतले. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचंही निधन झाल्याची माहिती आहे.

जनार्दन पवार यांचे अंत्यसंस्कार पार पाडून घरी परतल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासानेच धनुर्धर कोल्हे यांनाही हृदयविकाराचा धक्का बसला. मुरलीधर पवार यांच्या मृत्यूनंतर अवघ्या अर्ध्या तासातच धनुर्धर कोल्हे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच दिवशी गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावात शांतता पसरली.

थोडक्यात बातम्या- 

मी छत्रपती घराण्याचा वारस आहे, कसा मॅनेज होईन?- खासदार संभाजीराजे

पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद नाही- जयंत पाटील

“लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचं नाव घेऊन मी पुन्हा येईनचं सोंग करतंय”

महाराष्ट्रात कोळीच्या दोन नवीन प्रजातींचा शोध; कोळ्याच्या प्रजातींना शहीद तुकाराम ओंबळेंचं नाव

“फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More