UPS Pension | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून नवीन पेन्शन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचं नाव यूनिफाइड पेन्शन स्कीम (UPS Pension) असणार आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांना एनपीएस किंवा युपीएस यापैकी एक पेन्शन योजना निवडता येईल. युपीएस योजनेत सरकारकडून 18.5 टक्के योगदान दिले जाईल. ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल. निवृत्तीच्या अगोदर 12 महिन्याची सरासरी पगाराचे 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून त्या कर्मचाऱ्यास मिळेल. मात्र, त्यासाठी, 25 वर्षे नोकरी करणे बंधनकारक आहे.
सरकारचं सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट
कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा पेन्शनचा लाभ मिळेल. पत्नीला 60 टक्के पेन्शन दिली जाईल. कोणत्याही केंद्रीय कर्मचाऱ्याला किमान 10 हजार रुपये पेन्शन मिळेल. तसंच महागाईच्या आधारेही पेन्शन दिली जाईल. कर्मचाऱ्यांना एकत्रित अशी सुपर एनुएशन रक्कमही मिळेल.
युनिफाइड पेन्शन योजनेस (UPS) मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिली. नोकरीतील निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनच्या अनुषंगाने ही योजना लागू करण्यात आली आहे.
UPS Pension योजनेस कॅबिनेटची मंजुरी
सरकारी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने पेन्शन (Pension) योजनेत सुधारणा करण्याची मागणी होत होती. त्यानुसार केंद्र सरकारने नव्या पेन्शन योजनेसाठी डॉ. सोमनाथ कमिटी गठीत केली होती. या समितीने पेन्शनसंदर्भात विस्तीर्ण चर्चेनंतर केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालाच्या अभ्यासानंतर केंद्र सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत पेन्शन योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेतला.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीमला मंजुरी दिलीय. या योजनेंतर्गत 50 टक्के पेन्शन निश्चित करणं हा पहिला उद्देश आहे
महत्त्वाच्या बातम्या-
उर्वरित बहिणींना कधी मिळणार लाभ?, अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय!
मोठी दुर्घटना! पुण्यात ‘या’ ठिकाणी हेलिकॉप्टर क्रॅश
सरकारने 150 पेक्षा अधिक औषधांवर घातली बंदी; पाहा औषधांची यादी
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार का? वाचा सविस्तर