बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

UPSC पूर्व परिक्षेचा निकाल जाहीर! मुख्य परिक्षेसाठी पुन्हा भरावा लागणार अर्ज

नवी दिल्ली | केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएसीच्या नागरी सेवा पूर्व परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 10 ऑक्टोबर रोजी यूपीएससीच्या वतीने ही पूर्व परिक्षा घेण्यात आली होती आणि अखेर या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यूपीएससीच्या upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जाहिर करण्यात आला आहे.

यंदाची नागरी सेवा मुख्य परिक्षा ही 712 पदांसाठी घेतली जात आहे. तर यूपीएससीच्या नागरी सेवा पूर्व परिक्षेसाठी जवळपास 10 लाख उमेदवारांनी नोंदणी केली होती. या पूर्व परिक्षेचा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून उमेदवारांना तो पीडीएफच्या स्वरूपात पाहता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी upsc.gov.in ही साईट उघडल्यानंतर what’s new या विभागात निकाल पाहायला मिळणार आहे. ही लिंक उघडल्यानंतर यावर निकालाची पीडीएफ फाईल उपलब्ध होईल. यात रोल नंबर नोंदवल्यानंतर उमेदवाराला निकाल पाहता येणार आहे.

तर मुख्य परिक्षेसाठी नव्याने अर्ज भरावे लागणार असल्याचं नोटिफिकेशन यूपीएससीकडून जारी करण्यात आलं आहे. मुख्य परिक्षेसाठी अर्ज आणि त्यासाठीची फिसही लवकरच जाहीर करणार असल्याचंही यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“सतेज पाटलांनी लाखोंचं मुद्रांक शुल्क बुडवून सरकारची फसवणूक केली”

‘4 दिवसाच्या वाळक्या भाकऱ्या खातोय साहेब’; पाहा एसटी कर्मचाऱ्याची दयनीय अवस्था

डेल्टा व्हेरिएंटविषयी संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

पुनित राजकुमार यांच्या आयुष्यातील ‘ही’ खास व्यक्ती भारतात आल्यानंतरच होणार अंत्यसंस्कार

पुणेकरांची प्रतिक्षा संपणार! नव्या वर्षात पुणे मेट्रो सेवेत दाखल होणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More