बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युपीएससीचा निकाल जाहीर! बिहारचा शुभम कुमार देशात पहिला, तर पहिल्या शंभरमध्ये महाराष्ट्रातील तिघं

नवी दिल्ली | केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. युपीएससी परीक्षामध्ये बिहार राज्यातील शुभम कुमार देशात प्रथम आला आहे. तर  जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्राची मृणाली जोशी आणि विनायक नरवदे हे 36 आणि 37 व्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर विनायक महामुनी हा युपीएससी परीक्षामध्ये 95 व्या स्थानी आला आहे.

कोरोना महामारीमुळे सगळ्याच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे युपीएससीची मुलाखत प्रक्रिया देखील लांबणीवर गेली होती. त्यामुळे मुख्य निकालही उशिरा लागला आहे. युपीएससीची मुख्य परीक्षा जानेवारी 2021 मध्ये पार पाडली होती. तर मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती – ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झाल्या होत्या.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षासाठी जनरल मधून 263, ईडब्लूएसमधून 86, ओबीसीप्रवर्गातून 229, तर एससी 122 आणि एसटी मधून 61 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. एकूण 761 जागांसाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 180 आयएएस, आयएफएस 36, आयपीएस 200, अ गटातील केंद्रीय प्रशासकीय सेवा 302 आणि ब गटातील प्रशासकीय सेवा 188 या पदांसाठी उमेदवारांची निवड झाली आहे.

दरम्यान, कोरोना महामारीचा फटका स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्य़ार्थांना बसला आहे. मागील काही वर्षात महामारीमुळे परीक्षाच झाल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक तरूण निराश होते. अशातच आता युपीएससीचा निकाल जाहीर झाल्यामुळे तरूणांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर काही जण असफलतेमुळे दु: खी आहेत.

थोडक्यात बातम्या- 

पंतप्रधान मोदींचा मुत्सद्दीपणा! कमला हॅरिस यांना दिलं ‘हे’ खास गिफ्ट

“तिला 52 दिवस तुरूंगात ठेवलं, आता राऊतांनी महिला सन्मानाच्या गोष्टी करूच नयेत”

”महाराष्ट्रातील सर्व कामांची यादी द्या, लागतील तेवढे रोप-वे, रस्ते, पूल बांधून देईन”

‘गडकरी साहेबांचा फोन आला, अजित जरा लवकर ये…’; अजित पवारांनी सांगितला किस्सा

”हिंदू खतरे में है, हा तर भाजपचा जुमला, आता भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करावेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More