Top News

कौतुकास्पद! वडिलांसोबत दुकानात काम करत शुभम गुप्ता झाला IAS

नवी दिल्ली | वडिलांसोबत दुकानात काम करत अभ्यास करून शुभम गुप्ता IAS झाला. शुभम गुप्ता 2018 च्या बॅचचा टॉपर आहे. त्यानं All India Rank 6 मिळवलं आहे.

स्पर्धा परिक्षेला सामोरं जाताना अनेक अडचणींचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागतो. यामध्ये कोणाला यश मिळतं तर कोण अर्ध्यातच हिंमत सोडून देतो. डहाणूच्या शुभम गुप्ताला चौथ्या प्रयत्नात यश मिळालं आहे.

वडिलांच्या अपार कष्टामुळेच आज मी आयएएस झालोय. आर्थिक तंगी असतानाही त्यांनी माझं मनोधेर्य खचू दिलं नाही. सतत माझ्या पाठीशी उभे राहिले, असं शुभमने सांगितलं आहे.

शुभम मुळचा राजस्थानमधील जयपूरचा राहणारा आहे. त्याचं प्राथमिक शिक्षण जयपूरमध्येच झालं. शाळेत असतानाच त्याच्यातील गुण आई-वडिलांनी ओळखलं होतं. गरिब परिस्थितीतही शुभमने शिकण्याची आणि अभ्यासाची आपली जिद्द सोडली नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

कला, क्रीडा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सर्वंकष धोरण आणणार- बच्चू कडू

…म्हणून बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला!

महत्वाच्या बातम्या-

नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमधून कोरोनाचे 5 संशयित रूग्ण पळाले

मोदी सरकारकडून पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ

भारतात 11 रुग्णांचा कोरोनाशी यशस्वी लढा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या