मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी आणि युपीएससीच्या परिक्षा रखडलेल्या होत्या. मात्र आता मंदावलेली कोरोनाची परिस्थीती पाहता या परिक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत.
8 ते 17 जानेवारीदरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 15 फेब्रुवारीनंतर होईल, अशी माहिती आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या ‘ईडब्ल्यूएस’ च पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे.
दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिली.
थो़डक्यात बातम्या-
ममता बॅनर्जींना मोठा धक्का; क्रीडामंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांचा राजीनामा
रोहित पवारांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र; केली ‘ही’ विनंती
…तर राज्य सरकार गरिबांना मोफत लस देणार- राजेश टाेपे
…तर मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे- गिरीश महाजन
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी