Top News देश

यूपीएससी परीक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार!

नवी दिल्ली | यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे यूपीएससी पूर्व परीक्षा ठरवलेल्या वेळी म्हणजे 4 ऑक्टोबरलाच होणार आहे.

कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करून केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा लांबणीवर टाकाव्यात अशी मागणी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती.

न्यायालयाने यूपीएससीने परीक्षेच्या वेळी आरोग्यविषयक घेण्यात येणाऱ्या खबरदारीबाबत सविस्तर माहिती सादर केल्याचं स्पष्ट करत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळून लावली.

महत्वाच्या बातम्या-

हाथरसनंतर बलरामपूरमध्येही आणखी एका मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडितेचा मृत्यू

पुण्यात कुरकुंभ येथील शिवशक्ती ऑक्सीलेट कंपनीत भीषण आग

बाबरी मशीद भूकंपामुळे पडली होती का?- गौहर खान

राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या