मुलगा होत नाही म्हणून आजीने नातीच्या गुप्तांगाला चटके दिले!

रोहतक | मुलगा होत नाही म्हणून आजीनेच आपल्या नातीच्या गुप्तांगाला चटके दिले. हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील मोजूखेरा गावात ही संतापजनक घटना घडली. हिंदुस्थान टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिलंय. 

मुलाला मुलगा होत नाही म्हणून संतप्त झालेल्या आजीने अंगणात खेळणाऱ्या आपल्या चार वर्षांच्या नातीला घरात बोलावून घेतलं आणि तिच्या गुप्तांगाला चटके दिले. 

मुलीच्या आई-वडिलांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनीही तो लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांमुळे ही घटना उजेडात आली, त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.