बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…अन्यथा आम्ही जशास तसं उत्तर देऊ’; एकनाथ शिंदे यांचा भाजपला निर्वाणीचा इशारा

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये (Karnataka) विटंबना करण्यात आली होती. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी (CM Of Karanataka) त्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनात राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी याप्रकरणावरून कर्नाटक सरकारवर जहरी टीका केली आहे. कर्नाटकमध्ये मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायावर शिंदे यांनी कर्नाटक सरकारला चांगलंच सुनावलं आहे.

बंगळुरू मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाइफेक करून विटंबना केली. हे चुकीचं असून त्याचा निषेध करणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठी माणसांचेच नाहीतर संपूर्ण हिंदुस्थानातील शिवभक्तांचे दैवत आहेत. त्यांचा अपमान कदापी खपवून घेणार नाही, अशी कठोर शब्दात टीका शिंदे यांनी केली आहे.

कर्नाटक सरकारकडून सीमावर्ती भागातील मराठी भाषिक बांधवावर सातत्याने होत असलेला अन्याय, अत्याचार व दादागिरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. जसे मराठी भाषिक तिथे कर्नाटकात राहतात तसेच अनेक कन्नड भाषिक लोक सुद्धा इथे महाराष्ट्रात राहतात. त्यांच्याशी आम्ही तसंच वागावे का?, याबाबत आता निर्वाणीचा निर्णय घ्यायची वेळ आली असून कठोर निर्णय घ्यायची वेळ येऊ देऊ नका, अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा राज्यातील भाजप नेत्यांनी निषेध केला नाही. राज्यातील भाजपच्या नेत्यांना महाराजांपेक्षा त्यांचा पक्ष महत्त्वाचा वाटतो, अशी टीका महाविकास आघाडीकडून भाजपवर करण्यात येतं आहे.

थोडक्यात बातम्या 

‘भारतात दररोज Omicron चे 1.8 लाख रूग्ण आढळतील’; तज्ज्ञांचा धक्कादायक दावा

‘काही झालं की भाजपच्या महिला नेत्या बोंबलत सुटतात’; शिवसेना आमदाराचे बिगडे बोल

पत्रकार परिषद घेत करूणा मुंडेंचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या…

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

नितेश राणेंना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणी चौकशी होणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More