‘मेरी डीपी ढासू, चित्रा मेरी सासू’; उर्फीने पुन्हा डिवचलं

मुबंई | भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांचा वाद आता चांगलाच इरेला पेटला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात ट्विट केल्यानंतर हे प्रकरण सुुरु झालं होतं.

अशातही हा वाद शमवण्याऐवजी दिवसेंदिवस याचा भडका वाढताना दिसतोय. उर्फी जावेद (Urfi Javed) आणि चित्रा वाघ यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाने जोर धरलाय. नुकताच पुन्हा एकदा उर्फीने एक पोस्ट टाकली आहे. ज्याची सध्या चर्चा सुरु आहे.

उर्फीने तिच्या ट्विटर (Twitter) हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. तिनं तिच्या पहिल्या फोटोत लिहलंय ‘लेकीन अभी भी थोडा सुधार बाकी है, साॅरी चित्रा वाघजी आय लव्ह यू. यामध्ये तिने चित्रा वाघ यांना मेन्शन केलं आहे.

दुसऱ्या फोटोत उर्फीने लिहलयं ‘मेरी डीपी इतनी ढासू,चित्रा मेरी सासू’ असं तिनं तिच्या दुसऱ्या फोटोला कॅप्शन (Caption) दिलं आहे. यामुळे आता पुन्हा वाद वाढणार असल्याचं दिसतंय.

उर्फी जावेद हिला दिसताक्षणी तिचं थोबाड रंगवू असं वाघ म्हणाल्या होत्या. थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. दरम्यान उर्फीने ही नवीन पोस्ट करुन वाघ यांना डिवचलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या