“मी पूर्ण कपड्यांत फिरते, बाकीच्यांचं मला माहित नाही”

मुंबई| उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील सुरु असलेले शीतयुद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीये. सार्वजनिक ठिकाणी उर्फी अंगप्रदर्शन करते असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.

यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील आपली प्रतिक्रिया देत उर्फीनं जे काही केलंय त्यात काही चुकीचं नाही, असं वक्तव्य केलं होतं. आता यानंतर प्रकरणावर राजकारणातील अणखी एका नेत्याच्या पत्नीने प्रतिक्रिया दिलीये.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. नवी मुंबईत क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी पत्रकारांनी त्यांना उर्फी जावेद प्रकरणावर तुमचे महिला म्हणून काय मत आहे? असा प्रश्न केला. या प्रश्नाचे उत्तर देताना “मी पूर्ण कपड्यांत फिरते. बाकीच्यांचं मला माहित नाही,” असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामधील वाद सुरु झाले तेव्हापासून या दोघी एकमेकांना ट्विटर वरुन डीवचत असतात. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवरून पुन्हा निशाणा साधला. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा.

त्यावर उर्फीनं थेट मुंबई येथील अंबोली पोलीस स्टेशन येथे जाऊन जबाब दिला. मला कपडे घालण्याचा अधिकार आहे. तसेच चित्रा वाघ यांनी धमकी दिल्याचा आरोपही उर्फी जावेदने केला आहे. 

थोक्यात बातम्या-

चौकशीला जाण्याआधी इक्बाल सिंह चहल यांनी केली ‘ही’ मोठी मागणी!

महाविकास आघाडीला झटका?; शुभांगी पाटील नॉट रिचेबल

नाशिक विधान परिषद निवडणुकीला नवं वळण!

शिंदे गटातील खासदाराचा धक्कादायक गौप्यस्फोट!

दारू धोकादायकच; संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर…