मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात चर्चेत असेलला उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा विषय दिवसेंदिवस वाढत चाललाय. राजकारणातील अनेकांनी या विषयावर प्रतिक्रिया देत हा विषय थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी हा वाद वाढतच चाललाय.
एवढंच नाही तर चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर सुद्धा याप्रकरणावरून निशाणा साधला होता. मात्र उर्फी प्रकरणावर कारवाई करण्याइतका वेळ महिला आयोगाला नसल्याची भूमिका रुपाली चाकणकर यांनी घेतली.
त्यानंतर उर्फीला मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा जर उर्फी समोर आली तर तिचं थोबाड फोडेन असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं. त्यावरुन माझ्या जिवाला चित्रा वाघ आणि त्यांच्या समर्थकांकडून धोका असल्याची तकरार उर्फीनं पोलिस स्टेश्नमध्ये केली होती.
त्यावरुन आता उर्फीच्या सुरक्षेबद्दल चित्र बदलताना दिसत आहे. महिला आयोगाकडून उर्फीच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडे पत्र देऊन मागणी केली आहे. उर्फीला सुरक्षा देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली.
उर्फी जावेदच्या फॅशनस्टाईल आणि मोडक्या तोडक्या कपड्यांमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांना तिच्यावर कारवाई करण्याचा आदेश सुद्दा दिला होता. त्यानंतर अनेक वाद विवाद झाले.
थोडक्यात बातम्या-
वंचितला सोबत घेण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
पाकिस्तानातील सोन्याचा भाव ऐकून डोक्याला हात लावाल!
‘मी माझं डोकं कापून टाकेन पण…’; राहुल गांधींचं मोठं वक्तव्य
अत्यंत धक्कादायक घटना; मुलीचं प्रेमप्रकरण कळताच बापाने केलं भयानक कृत्य