बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उर्फी जावेदचे ‘या’ दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाली…

मुंबई | अभिनेत्री उर्फी जावेद बिग बॉसमधून घराघरात पोहोचली. उर्फी तिच्या हटके कपड्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय असते. मात्र अभिनेत्री उर्फी जावेद एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कास्टिंग डायरेक्टर ओबेद आफ्रिदी याच्यावर लैंगिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप उर्फी जावेदने केला आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. आफ्रिदीने एका म्युझिक व्हिडिओसाठी कॉम्प्रोमाईज करायला सांगितले असल्याचा आरोपही उर्फीने केला आहे.

आफ्रिदीने एका म्युझिक व्हिडिओसाठी कॉम्प्रोमाईज करायला सांगितले. त्यानंतर त्याने अयोग्य वागणूक दिली व अपशब्द देखील वापरले, असे आरोप उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून केले आहेत.

दरम्यान, हे सगळं मी पैशासाठी करत नाहीये. मला फक्त कास्टिंग डायरेक्टर ओबेद आफ्रिदीचा पर्दाफाश करायचा आहे, असं देखील उर्फी जावेदने स्पष्ट केलं आहे. उर्फीने शेअर केलेल्या स्टोरीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरे स्वत: दारू पित नाहीत, मग जनतेला वाईन का पाजत आहेत?”

दिशा सालियनला ‘त्या’ रात्री घेऊन गेलेली ती गाडी सचिन वाझेची?, नितेश राणेंचा गौप्यस्फोट

… तर कोरोनाची आणखी एक लाट येईल, कोविड टास्क फोर्स अधिकाऱ्यांनी दिली धक्कादायक माहिती

“संजय राऊतांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्र्वरही करणार नाही”

“गुलाबराव तुम्ही नाव लावूच नका, तुमच्या नावातील पहिलंच अक्षर खराब आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More