बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारतीय चित्रपट सृष्टीला तातडीने स्वच्छ करण्याची गरज, इथं सर्वात जास्त…”

मुंबई | ड्रग्स प्रकरणी एनसीबीने शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसातील राज्यात राजकीय वातावरण अलमी पदार्थाच्या मुद्यावरून फिरताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जे दारू पितात किंवा सिगारेट ओढतात त्यांना तुरूंगात पाठवले जात नाही, परंतु ज्यांच्याकडे अमली पदार्थांचे प्रमाण त्यांनी कितीही घेतले तरी त्यांना तुरूंगात टाकले जाते. या गोष्टी बदलण्याची गरज आहे आणि जे व्यसनी आहेत किंवा ड्रग्स वापरतात, त्यांना चांगल्या आरोग्य सेवेसाठी पुनर्वसन केंद्र किंवा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं पाहिजे. तसेच चित्रपट उद्योगात सर्वाधिक ड्रग्, विकले जातात आणि भारतीय चित्रपट सृष्टीला तातडीने स्वच्छ करण्याची गरज आहे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील अमली पदार्थाच्या मोठ्या प्रमाणातील सेवन करत असल्याचा मुद्धा समोर आला. आर्यन खानवरील कारवाईत बिलकूल पक्षपातीपणा नसून, त्याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्यानेच न्यायालय त्याला जामीन देत नसावे. सक्तवसूली संचालनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या छापेमारीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई ही होणारच असल्याचंही रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात बॉलिवुडमधील अनेक कलाकारांना केंद्रीय तपास यंत्रणांनी समन्स बजावलं आहे. यामध्ये भारती सिंग, नुरा फतेअली खान, अनन्या पांडे, जॅकलीन फर्नांडीस यांचा समावेश आहे. त्यामुळे ड्रग्स प्रकरणावरून राज्यात अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.

थोडक्यात बातम्या-

“विराटने खेळभावनेने पराभव स्वीकारला, मला त्याचं कौतुक वाटतंय”

दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये खळबळ! ‘या’ दिग्गज खेळाडूला संघातून वगळलं

मोठी बातमी! ड्रग्स प्रकरणात पहिला जामीन मंजूर; आर्यन खानला सुट्टी नाहीच

“नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या”

बँकेची कामं आटोपून घ्या! पुढील महिन्यात बँका 17 दिवस बंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More