महाराष्ट्र मुंबई

कितीही ट्रोल करा, मी मराठी मुलगी आहे, मागे हटणार नाही- उर्मिला मातोंडकर

मुंबई | कितीही ट्रोल करा. मी मराठी मुलगी आहे. मागे हटणार नाही. माझं काम करतच राहणार, असं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलंय.

ट्रोलरमुळे देशात विद्वेषाचं वातावरण निर्माण झालं आहे. अत्यंत हीनपातळीवर ट्रोलिंग केल्या जातं. मला पुन्हा ट्रोल केल्या जात आहे. पण ट्रोल केल्यामुळे मी योग्य रस्त्यावरून जात असल्याचं माझ्या लक्षात येतंय, असं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं.

मला कितीही ट्रोल केलं तरी मी मागे हटणार नाही. मी मराठी मुलगी आहे. मराठी पाऊल पुढे पडतच राहणार, असा इशारा उर्मिला मातोंडकर यांनी दिला आहे.

शिवसेनेची महिला आघाडी अत्यंत भक्कम आहे. या आघाडीचा एक भाग होता आलं. त्याबद्दल मला आनंदच आहे, असं सांगतानाच आमदारकीसाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. पण मी शिवसैनिक असून शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे, असंही उर्मिला मातोंडकर म्हणाल्यात.

महत्वाच्या बातम्या-

“कोरोना काळात उद्धवजींनी महाराष्ट्र सांभाळला, महाविकास आघाडीचं काम वाखणण्याजोगं”

हो…काँग्रेसची विधानपरिषदेची ऑफर मी नाकारली; उर्मिला मातोंडकर यांचा खुलासा

“पदाची अपेक्षा नाही; लोकांसाठी काम करायचंय म्हणून शिवसेनेत आले”

विहंग सरनाईक ईडीच्या चौकशीला गैरहजर; कारवाई होण्याची शक्यता

“पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची गरज पडणार नाही

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या