महाराष्ट्र मुंबई

ज्या देशातील शेतकरी दु:खी आहे, तो देश कधीच प्रगती करु शकत नाही- उर्मिला मातोंडकर

मुंबई | केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या देशातील शेतकरी दु:खी आहे. तो देश कधीच प्रगती करु शकत नाही. त्या देशात नेहमीच अडचण होत राहणार, असं मत उर्मिला मातोंडकर यांनी  व्यक्त केलं आहे.

केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीत. शेतकऱ्यांना चुकीची वागणूक दिली आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील आहे. केंद्राने शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकणं गरजेचे आहे, असंही उर्मिला मातोंडकरांनी सांगितलं.

देशभरातील महिलांच्या प्रश्नांकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जात आहे. महिलांच्या गरजांकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत, असंही उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

थोडक्यात बातम्याा-

वाढदिवसाचा केक कापून तरुण झाला फरार; पोलिसांनी मित्रालाच ठोकल्या बेड्या!

नववीतील विद्यार्थिनीवर ८ जणांकडून बलात्कार; १३ दिवस सुरु होता धक्कादायक प्रकार

“शेतीतलं शिवसेनेला काय कळतं?, शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही ते फक्त…”

“शिवसेना बाळासाहेबांची शिकवण विसरली, संपूर्ण पक्ष शरद पवारांपुढे लीन झालाय”

दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन देशभर पसरलं पाहिजे- अण्णा हजारे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या