कोल्हापूर महाराष्ट्र

पूरग्रस्तांसाठी उर्मिला मातोंडकरचं मोठं पाऊल, थेट पोहोचली…

कोल्हापूर | कोल्हापूर-सांगलीतील महापुराचं पाणी ओसरत असलं तरी त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्या कायम आहेत. सांगली कोल्हापुरातल्या पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा अविरतपणे ओघ सुरू आहे. अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत.

प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा मदतीसाठी सरसावलेला 1 हात कधीही महत्वाचा असतो. मी मदत करून खारीचा वाटा उचललाय. तुम्हीही मदत करा, असं उर्मिलाने म्हटलं आहे. उर्मिलाने सांगली कोल्हापूर गाठत पूरग्रस्तांना मदतीचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीसाठी आम्ही आमचा खारीचा वाटा उचलत आहोत. पूर पीडितांना कष्ट, त्रास, अपेष्टा ह्यांच्या पासून स्वतंत्र करण्यासाठी हा स्वातंत्र्य दिन त्यांच्यासाठी समर्पित, अशा आशयाचं ट्वीट उर्मिलाने केलं आहे.

सांगली कोल्हापुरातल्या पूरपरिस्थितीने अनेकांच्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं झालंय. परंतू या पूरपरिस्थितीत मात्र माणुसकीचा महापूर आलाय.

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्तांच्या मदतीला क्रिकेटचा ‘देव’ धावला! इतरांनाही मदत करण्याचं आवाहन

-“तो पराभव मी कधीही विसरू शकत नाही”

-चांद्रयान-2 ने पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेने प्रवास!

-काश्मिरच्या लाल चौकात अमित शहा फडकवणार तिरंगा!

-शूर आम्ही सरदार आम्हाला फक्त ईडीची भीती- रामदास फुटाणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या