मुंबई | बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधून उर्मिला यांना शिवसेनेत प्रवेश केलाय.
शिवसेनेच्या कोट्यातून विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त जागेसाठी उर्मिला मातोंडकर यांचं नाव पाठवण्यात आलंय. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती दिली होती.
त्याप्रमाणे आज उर्मिला मातोंडकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्या. यावेळी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हातावर शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केलंय.
दरम्यान उर्मिला मातोंडकर आज दुपारी वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यापूर्वी त्यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली होती.
महत्वाच्या बातम्या-
“आपल्यावर शेतकऱ्यांचं कर्ज आहे, लाठ्या-काठ्या, अश्रुधुराच्या माऱ्याने ते फिटणार नाही”
“आता शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?”
बॉलिवूड उत्तर प्रदेशला हलवण्याचा प्लॅन?; चंद्रकांत पाटलांची महत्त्वाची प्रतिक्रिया
फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत येणार!
सुप्रिया सुळेंनी उडवली नारायण राणेंची खिल्ली; म्हणाल्या…