Top News पुणे मनोरंजन महाराष्ट्र

बनावटी प्रचार करणाऱ्यांविरोधात हा आपला विजय आहे- उर्मिला मातोंडकर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि सतत बेताल वक्तव्यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. उर्मिलाने तिच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेल्या समर्थकांचे आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट करत आभार मानले आहेत.

कंगना राणावतने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटलं होतं. त्यावेळी अनेकजण उर्मिलाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. या सगळ्या सर्मथकांना ‘अस्सल हिंदूस्थानी’ असं संबोधून उर्मिलाने आज त्यांचे आभार मानले आहेत.

मला साथ देणाऱ्या निष्पक्ष तसेच प्रतिष्ठत मिडीयातील व्यक्तींचे मी मनापासून धन्यवाद देते. फेक आयटी ट्रोलर आणि त्यांच्या प्रचाराविरोधात हा तुमचा विजय आहे. मी तुमच्या पाठिंब्याने मी खूप भारावून गेलेय…जय हिंद, असं ट्विट उर्मिलाने केलं आहे.

दरम्यान, उर्मिलाच्या या ट्विटवर अनेकांनी भरभरुन कमेंट केली आहे. अनेकांनी सिनेमासृष्टीला तिने दिलेल्या योगदानाबद्दल तिचे आभार मानले तर अनेकांनी आम्हाला तुझा अभिमान वाटतो, असं म्हणतं प्रतिक्रीया दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

….म्हणून इंदूमिलचं पुन्हा आमंत्रण आलं तरी जाणार नाही- प्रकाश आंबेडकर

‘…तर नक्कीच काहीतरी गडबड आहे’; संजय राऊतांचं मोदींवर टीकास्त्र

“एक काम कर, चार-पाच जणांना घेऊन तूच भारत-चीन सीमेवर लढायला जा”

‘तुकाराम मुंढेंची पुन्हा नागपूरात बदली करा’; शिवसेनेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

सनी लिओनीचा कंगणा राणावतला टोला, म्हणाली…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या