मुंबई | प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे. त्यामुळे त्यांचे विचार आणि स्वत: बाळासाहेब अजूनची आमच्यासोबतच आहेत, असं शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलंय.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरील आयोजित रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. याला उर्मिला मातोंडकर यांनी हजेरी लावली. यावेळी त्या बोलत होत्या.
आज मी शिवसेनेचा भाग आहे म्हणून इथं आले असले तरी बाळासाहेबांबाबत माझ्या मनात नेहमीच आदर राहीला आहे. बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम करू शकलो, असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलंय.
सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत, असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“हिंदुत्व ज्यांचा श्वास होता अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदरांजली”
“चंद्रकांत पाटलांचं गणित कच्चं आहे, भाजप शेवटून एक नंबरचा पक्ष”
महाराष्ट्रात भाजप जो काही आहे त्याचं श्रेय बाळासाहेबांना जात- संजय राऊत
“जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली, रेणू शर्माची नार्को टेस्ट करा”
कोरोनाची लस घ्यायची असेल तर ही गोष्ट आत्ताच करा, नाहीतर येऊ शकते मोठी अडचण!