पुणे | सीएए हा काळा कायदा म्हणून इतिहास नोंद करेल. सीएए कायदा मुस्लिम विरोधी भासवला जात आहे. तो मुस्लिम विरोधी तर आहे पण गरिबांच्याही विरोधात आहे त्यामुळे हा कायदा आम्हाला मान्य नाही, असं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
पुण्यात गांधी भवन येथे महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उर्मिला मातोंडकर यांनी सीएए आणि एनआरसीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
गांधी आजही विचारानं आपल्यात आहे. त्या विचारावर देश उभा आहे, अहिंसेच्या मार्गानं पुढं जायचं आहे. आजची लढाई आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनीधींच्या विरोधात आहे. लोकशाही म्हणजे संसद नव्हे तर लोकशाही म्हणजे देशाचे नागरिक असतात आणि नेते सुद्धा नागरिकच असतात, असं उर्मिला यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, महात्मा गांधींच्या विचारधारेचा तेव्हाही खून करण्याचा प्रयत्न झाला आणि आताही होत आहे, असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं.
ट्रेंडिंग बातम्या-
मुस्लिमांशी खेळाल तर मोदींना पुन्हा चहा विकावा लागेल- इम्तियाज जलील
सहकार क्षेत्र भाजपमुक्त?; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
महत्वाच्या बातम्या-
मुबारक हो टुकडे टुकडे भाजप– अनुराग कश्यप
कलह पसरवणाऱ्यांना समाजच सरळ करेल- मोहन भागवत
3500 मराठा उमेदवारांना तात्काळ नियुक्ती दया नाहीतर…- प्रवीण दरेकर
Comments are closed.