महाराष्ट्र मुंबई

…म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडला- उर्मिला मातोंडकर

मुंबई | काँग्रेस पक्षात आल्यानंतर काही काळानंतर लगेचच उर्मिला मातोंडकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना उर्मिला यांनी पक्ष सोडण्यामागचं कारण सांगितलंय. तसेच काँग्रेस पक्षावर नाराजीही व्यक्त केलीये.

आपण करत असलेले प्रयत्न मर्यादित होत असून, काहीच होत नाहीये तर नावापुरतं तिथं राहण्यापेक्षा तीच गोष्ट एखाद्या पक्षात न राहता स्वतंत्रपणे करु इच्छिते आणि करत आहे, असं उर्मिला यांनी सांगितलं.

एक कलाकार म्हणून जगातील ऐशोआरामाची अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी माझ्या आयुष्यात नव्हती. पण सामाजिक बांधिलकी, सामाजिक कृतज्ञता समजणाऱ्या एका कुटुंबात आणि प्रदेशात माझा जन्म झाला होता. त्यामुळे मी काहीतरी लोकांना थोडं परत द्यावं या विचाराने राजकारणात आले होते. पण त्या काळात मी जे करु इच्छित आहे ते करायला मिळत नाहीये असं वाटलं, असं उर्मिला मातोंडकरांनी सांगितलंय.

घिसडघाई होत असल्याची जाणीव होत होती. माझी पत्रं लिक केली गेली. त्या पत्रांमध्ये मी केवळ मुंबई स्तरावर पक्षात काही बदल व्हावेत यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यातलं काहीही होत नव्हतं, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

आरोग्यमंत्री राजेश टोपे शिरुरमध्ये थांबले असताना चौकशी दरम्यान आला ‘हा’ प्रकार समोर

“स्वत: शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं”

जनतेच्या पैशातून कंगणाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी?- उर्मिला मातोंडकर

शरद पवारांनी ‘त्या’ प्रकरणातील बनावट कागदपत्रं सार्वजनिक करावीत- प्रकाश आंबेडकर

पुण्याजवळील ‘या’ भागात होणार उद्यापासून लॉकडाऊन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या