महाराष्ट्र मुंबई

“कोरोना काळात उद्धवजींनी महाराष्ट्र सांभाळला, महाविकास आघाडीचं काम वाखणण्याजोगं”

मुंबई | कोव्हिड काळात उद्धवजींनी महाराष्ट्र सांभाळला तसंच महाविकास आघाडीचं काम वाखणण्याजोगं आहे, असं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलंय.

शिवसेना पक्षप्रवेशानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलंय.

महाराष्ट्रावर प्रचंड नैसर्गिक संकटं आली. चक्रीवादळ, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. पण या काळात महाविकास आघाडी सरकारने केलेलं काम जबरदस्त आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला. ते म्हणाले, आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेची परंपरा मोठी आहे. विधान परिषदेत महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि सामाजिक दर्जा वाढावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्या जागेचा दर्जा आणखी वाढला पाहिजे. त्यासाठी तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे. उद्धव यांचे हे विचारच मला खूप आवडले, असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“पदाची अपेक्षा नाही; लोकांसाठी काम करायचंय म्हणून शिवसेनेत आले”

विहंग सरनाईक ईडीच्या चौकशीला गैरहजर; कारवाई होण्याची शक्यता

“पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची गरज पडणार नाही”

अभिजित बिचकुलेंनंतर आता खासदार अमोल कोल्हे यांनाही मोठा धक्का!

“उर्मिला मातोंडकर यांना प्रवेश देऊन शिवसेनेकडून महिला कार्यकर्त्यांचं अवमूल्यन”  

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या