मुंबई | पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. यावर आता अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुळात शब्द हे जपून वापरावे लागतात, त्यामुळे मला असं वाटतं की शरजील नावाच्या इसमाने पुण्यामध्ये हिंदू धर्माच्याविरोधात जे काही शब्द वापरले, ते चुकीचे आणि दुर्दैवी होते. याबाबत पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलंय.
उर्मिला मातोंडकर यांनी विलेपार्ले इथे चिमुकल्यांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
ज्या शेतकऱ्यांनी देशासाठी सर्वकाही दिलं आहे, त्या शेतकऱ्यांच्या मागण्या आपण समजू शकतो. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होवोत यावर काहीतरी उपाय निघावा, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.
थोडक्यात बातम्या-
स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ वक्तव्य केलं- अजित पवार
नवरा दलित आहे म्हणून आई-वडिलांनी गरोदर मुलीसोबतच केलं हे धक्कादायक कृत्य
वसुलीसेना?; मुख्यमंत्र्यांचा फोटो छापून फेरीवाल्यांकडून फाडल्या जातायेत पावत्या
अमित शहांचे पूत्र कुठल्या आधारावर BCCI चे सचिव झाले?; मोदींचा सवाल
उपमुख्यमंत्री बदलण्याचा प्रस्ताव?; अजित पवार म्हणतात…