महाराष्ट्र मुंबई

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती”

मुंबई | सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत, असं म्हणत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरील आयोजित रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. याला उर्मिला मातोंडकर यांनी हजेरी लावली. यावेळी त्या बोलत होत्या.

कोविड काळात ज्यापद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी संयम दाखवला तो कौतुकास्पद होता. असे नेते देशातच खूप कमी आहेत आणि त्यातले सर्वात महत्वाचे नेते हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे, असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

मला असं वाटतं की ज्या माणसाचा कृतीवर विश्वास असतो त्याची कृती आणि महाराष्ट्रासाठीची प्रगती बोलते. त्यामुळे त्यांनी कमीत कमी बोललं तरी ते लोकांपर्यंत पोहोचतं, असं  उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेब आजही जिवंत आहेत- उर्मिला मातोंडकर

शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी जे करता येईल ते करु- प्रसाद लाड

“हिंदुत्व ज्यांचा श्वास होता अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आदरांजली”

“चंद्रकांत पाटलांचं गणित कच्चं आहे, भाजप शेवटून एक नंबरचा पक्ष”

महाराष्ट्रात भाजप जो काही आहे त्याचं श्रेय बाळासाहेबांना जात- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या