बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फाटलेली जीन्स युवा सांभाळतील पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?- उर्मिला मातोंडकर

मुंबई | आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत, असं वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर केलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी नेत्यांना लक्ष्य केलं आहे.

फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा नक्की सांभाळतील. पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय करणार?, असा खोचक सवाल करत उर्मिला मातोंडकर यांनी निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. त्यासोबतच शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही तीरथ सिंग रावत यांच्यावर निशाणा साधला होता.

देशातील संस्कृती आणि संस्कारावर त्या पुरुषांना फरक पडतो, जो महिलांना आणि त्यांच्या कपड्यांना जज करतात. विचार बदला मुख्यमंत्री रावतजी, असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना जवळच घेऊन बसलेली होती. त्या महिलेनं फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं तुम्ही कुठे जात आहात? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला. मी पुढे चौकशी केली तर त्या महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असं तीरथ सिंह रावत म्हणाले होते.

 

थोडक्यात बातम्या- 

ऐकावं ते नवलचं! ट्रकमध्ये हेल्मेट नाही घातलं म्हणुन चालकाला तब्बल एवढा दंड!

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अतिशय प्रामाणिक आणि नम्र व्यक्ती”

नुसता झगमगाट!!! ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश

‘मंत्रालयाची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कसची पाटी लावा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More