बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना नेते संजय राऊत रॉकस्टार- उर्मिला मातोंडकर

पुणे | शिवसेनेकडून राज्यभर शिवसंपर्क अभियान उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  या अभिनयाचा शुभारंभ पुण्यातून शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मातोंडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं.

संजय राऊत हे अनेक लोकांच्या अनेक टीका सहन करून त्यांच्यावर चोरावर मोर करायला भरपूर सक्षम आहेत. त्यावर मी काय बोलू… ते रॉक स्टार आहेत, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाची परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. अशा काळात त्यांच्या सारखा मुख्यमंत्री झाला नसता हे त्यांनी त्यांच्या कार्याने दाखवून दिलं आहे, असंही मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

विधान परिषदेतील बारा आमदारांच्या नियुक्तीबाबतही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. तो एक वेगळाच विषय आहे. राज्यपाल ती यादी मान्य करतील, तेव्हा करतील. त्यामुळे आपलं काम थांबत नाही. तसेच मी एखादी गोष्ट डोक्यात ठेवून राजकारणात आलेली नाही. जर राज्यपालांकडून करण्यात येणाऱ्या नियुक्तीवर बोलायचं झाल्यास तोंडावर मास्क आहे, तोच बरा आहे, असं सूचक वक्तव्य मातोंडकरांनी केलं. राज्यात सुरू असलेल्या ईडीच्या कारवायांवरही त्यांनी भाष्य केलं.

दरम्यान, ईडीच्या कारवाया वेळा साधून होत आहेत त्यामुळे त्यावर प्रश्न निर्माण होत आहे. ठराविक पक्ष आणि लोकांवरच कारवाया होत आहेत हे जास्तच साधून आल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर नाना पटोलेंनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

“रोहित पवार एकदा मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात”

“नाना पटोले यांच्या वक्तव्यांवरून महाविकास आघाडीमध्ये किती अविश्वासाचं वातावरण आहे, हे दिसून येते”

“केंद्रातील सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही”

“कोरोनाकाळात उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री झाला नसता हे त्यांनी आपल्या कार्याने दाखवून दिलं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More