बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण

मुंबई | शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. एकीकडे कोरोना आटोक्यात येत असताना आता हळूहळू कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

उर्मीला मातोंडकर यांनी स्वत: ट्विटरवरून ट्विट करत माझा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती देत माझी तब्येत बरी असून घरीच विलगीकरणात उपचार घेत असल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संपर्कात आलेल्या लोकांनी तात्काळ कोरोना चाचणी करून घ्वावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना हा ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा डोकं वर काढणार का?, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. तसेच काही दिवसांपुर्वीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.

परंतु, राज ठाकरे यांनी कोरोनावर मात केली असून ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. आता उर्मिला मातोंडकर यांचाही कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहनही उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या

इंदिरा गांधींना माहित होतं की त्यांची हत्या होऊ शकते, तरीही…; प्रियंका गांधीचं मोठं वक्तव्य

नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘या’ कारणामुळे सोडला ओटीटी प्लॅटफॉर्म; चाहत्यांना बसला मोठा धक्का

परमबीर सिंह कुठे गायब आहेत?, ‘या’ नेत्याने दिलं उत्तर

नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती हल्ला, गंभीर आरोप करत म्हणाले…

“त्यांनी लवंगी फटाके फोडले, मी 3 जावयांचे दिवाळीत एकदमच बॉम्ब फोडणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More