Top News राजकारण

“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”

मुंबई | राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. यावर उर्मिला मातोंडकर यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं समजतंय.

दरम्यान यासंदर्भात आता काँग्रेसने गौप्यस्फोट केला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसची ऑफर नाकारल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “आम्ही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांना विधान परिषदेसाठी विचारणा केली. मात्र त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगत नकार दिला. जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचं नक्कीच त्यांना स्वातंत्र्य आहे.”

उर्मिला यांनी यापूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. शिवाय त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण…- संजय राऊत

“बाळासाहेब ठाकरे असताना राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, पण आता… “

“…तर ही धर्मांधता म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल”

दिलासादायक! अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन वर्ग

प्रसंगी कर्ज काढू, पण दिवाळीपूर्वी वेतन देणारच; अनिल परब

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या