मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी नुकतंच आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. पण याचदरम्यान उर्मिला मातोंडकर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलंय.
अकाऊंट हॅक झाल्याचं कळताच उर्मिला मातोंडकर यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केलीये. दरम्यान यासंदर्भातील माहिती उर्मिला यांनी ट्विटर अकाऊंटवरून दिलीये.
उर्मिला त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलंय. पहिल्यांदा मला ते थेट मेसेज करून काही स्टेप्स फॉलो करायला सांगतात. त्यानंतर अकाऊंट व्हेरिफाय करतात आणि ते हॅक होतं.”
त्या पुढे लिहितात, “सायबर क्राइमकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये. इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे गेली. यासाठी मी डीसीपी रश्मी करंदीकर यांटी भेट घेतली. त्यांनी मला याविषयी बरीच माहितीही दिलीये.”
महत्त्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात सुधारित कायद्याची आवश्यकता- अशोक चव्हाण
‘शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस…’; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका
गोपिचंद पडळकरांचे संजय राऊतांना पत्र; शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमच्या…
“उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर कोणतेही आक्षेपार्ह ट्विट करणार नाही”
ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करा आणि मिळवा एक लाखाचं बक्षीस