मुंबई | शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या रक्तदान शिबिरात सहभागी झाल्या आहेत. शिवसेनेकडून अंधेरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जाऊन रक्तदान केलंय.
राज्यात सध्या रक्ताची टंचाई निर्माण झालीये. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्ताची टंचाई असल्याचं सांगत जनतेला स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं.
त्यानुसार आज उर्मिला मातोंडकर यांनी रक्तदान केलंय. कोरोनाच्या कठीण काळात रक्तदान शिबिर आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार देखील मानले आहेत.
उर्मिला मातोंडकर यांनी राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधान परिषदेवर शिवसेना उमेदवार म्हणून 1 डिसेंबर रोजी शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केलाय.
महत्वाच्या बातम्या-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा, म्हणाले…
रंगभूमीची सेवा करणारा सच्चा कलाकार आज गेला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ईडीकडून प्रताप सरनाईकांना तिसऱ्यांदा समन्स; 10 डिसेंबरला हजर राहण्याची सूचना
जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड
मुंबईतील लालबाग परिसरात सिलेंडरचा स्फोट; 16 जण जखमी
Comments are closed.