Top News महाराष्ट्र मुंबई

“टू मच डेमोक्रॉसी”, म्हणत उर्मिला मातोंडकरांची मोदी सरकारवर जोरदार टीका

मुंबई |  केंद्राने संसदेचं हिवाळी अधिवेश रद्द केलं आहे. त्यामुळे यावरुन मोदी सरकारवर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून अनेक टीका केल्या जात आहेत. यात आता अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

राज्यात जेव्हा निवडणुका घेण्यात आल्या त्यावेळी मोठ्या सभा घेण्यात आल्या. म्हणजे संसद वगळता सर्व देश खुला आहे. खूपच लोकशाही आहे (टू मच डेमोक्रॉसी) असा हॅशटॅग वापरत’, उर्मिला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

थंडीचे महिने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाचे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्राचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात येत असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

दरम्यान , केंद्राने संसदेचं हिवाळी अधिवेश रद्द केल्याचा निर्णय परस्पर घेतल्याचा आरोप होतं आहे. तसेच या निर्णयावरुन काँग्रेस या निर्णयाचा जोरदार विरोध करत असल्यामुळे हे अधिवेशन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणार आहे, असं पत्र केंद्र सरकारने विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला लिहिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘चांगला कलाकार चांगली व्यक्ती असेलच असं नाही’; स्वरा भास्करचा कंगणाला टोला

कांजूरमार्ग कारशेडप्रकरणी आदित्य ठाकरेंनी अभ्यास करावा- देवेंद्र फडणवीस

…तर सरकारचे 5500 कोटी वाचतील आणि 1 कोटी लोकांना फायदा होईल- आदित्य ठाकरे

“तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या, त्याचं वाचन सुरु झालं तर…”

“अशोक चव्हाण यांच्यासारखा निष्क्रिय माणूस पाहिला नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या