बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्यांना उर्मिला मातोंडकरचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…

मुंबई । भारतरत्न, महाराष्ट्राच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे काल रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी ब्रीच कॅन्डी रूग्णालयात निधन झालं. त्यानंतर संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या पध्दतीनं त्यांना श्रध्दांजली देण्यात येत आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शाहरुख लतादीदी यांच्या पार्थिवावर थुंकला असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावरती चांगल्याच रंगल्या आहेत. लाखोंच्या गर्दीत लतादीदींच्या पार्थिवावर थुंकनं कसं शक्य आहे, असं अनेकांचं म्हणनं आहे. मात्र शाहरुखनं दुआचे पठन करुन फुंकर मारली होती. सध्या मात्र त्यावरुन एक नविन वाद निर्माण झाला आहे.

शाहरुख खानला या प्रकरणावरुन  ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी चांगलंचं सुनावलं आहे. पंतप्रधानांकडून काहीतरी शिकायला हव होतं याला थुंकनं नाही तर फुंकणं म्हणतात. भारतमातेच्या मुलीचे गाणे ऐका ‘ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान. आजच्या दिवशी तरी सोडायचा असंही मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि पूजा ददलानी हे दोघे लतादीदींच्या पार्थिवाला श्रध्दांजली वाहण्यासाठी एकत्र स्टेजवरती आले होते. शाहरुख खाननं पहिल्यांदा प्रर्थना केली आणि पार्थिव शरिरावर फुंकर मारली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“एक हजार पाकिस्तानही लतादीदींच्या जाण्याची पोकळी भरुन काढू शकत नाही”

“मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर माझ्या हत्येचा कट ठाकरे सरकार रचत आहे”

नितेश राणेंची प्रकृती खालावली; ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

“जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, असं स्मारक राज्य सरकार आणि केंद्र सरकार तयार करेल”

“शिवाजी पार्क मैदानावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं स्मृतीस्थळ उभारण्यात यावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More