बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! उर्वशी रौतेलाने मड बाथसाठी मोजले तब्बल ‘इतके’ पैसे

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या वेगळाच कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे. उर्वशीने नुकतच तिच्या इन्स्टाग्रामवर मड बाथ करताना एक फोटो शेअर केला आहे.

मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्रामवर सक्रीय असणाऱ्या उर्वशीने मड बाथ अर्थातच चिखलाची आंघोळ करताना एक फोटो शेअर केला आहे. मात्र या मड बाथसाठी उर्वशीने तब्बल 20 हजार रुपये मोजले आहेत. मड बाथ त्वचेसाठी प्रचंड फायदेशीर असल्याचं अनेक डाॅक्टर सांगतात. तसेच मड बाथमुळे एक्झिमा, सोसायसीस यांसारख्या त्वचा रोगांची तीव्रता कमी करण्यासाठीही ते फायदेशीर ठरते.

उर्वशी तिच्या महागड्या फॅशनमुळे चर्चेत असते. ड्रेसिंग स्टाईलसह शूज, बॅग, गॉगल यामध्येही विविध प्रकारचे नवनवे ब्रँड्स तिच्याकडे पाहायला मिळतात. कितीही पैसा लागला तरी उर्वशीची खर्च करण्याची तयारी असते. मड स्पासाठी देखील उर्वशीला मोठी किंमत मोजावी लागली आहे.

दरम्यान, उर्वशीने ‘ग्रँड मस्ती’, ‘हेट स्टोरी 3’ असे अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच उर्वशी तिच्या फॅशन आणि बोल्ड अंदाजामुळे सतत चर्चेत असते. अशातच तिच्या मड बाथमुळे ती आता प्रचंड चर्चेत आली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

दैव देतं पण कर्म नेतं! राणू मंडलला उद्धपटणा पडला महागात, आता अशा प्रकारे जगते जीवन

मोदींना खोटं बोलण्यासाठी नोबेल पुरस्कार मिळायला हवा- दिग्विजय सिंह

वाह रे पठ्ठ्या! ‘या’ मराठमोळ्या मुलाने इन्स्टाग्रामवरील ती कमी दाखवली अन् कंपनीने दिले 22 लाख रुपये

ब्रेकींग! शिवसेना भवनासमोर आंदोलनात भाजप-सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने

भाच्याची गाडी अडवल्याने महिला आमदारने लगावली पोलिसाच्या कानशिलात

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More