बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचा मोठा दावा

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू होऊन आता जवळपास 50 दिवस होत आले आहेत. युक्रेनमधील (Ukraine) परिस्थिती भयावह असताना दिवसेंदिवस रशियाने (Russia) युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत.

या युद्धात युक्रेन यशस्वी होण्यासाठी, वाटाघाटीच्या टेबलावर युक्रेनला मजबूत ठेवण्यासाठी अमेरिका आक्रमक उपाययोजना राबवण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी सीएनएनशी (CNN) बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे.

युक्रेनला मजबूत ठेवण्यासाठी, त्यांच्या विजयासाठी आम्ही मोठी पावलं उचलत आहोत. आम्ही असंच करू आणि आम्ही याबाबत पुढाकार घेत राहू, असा दावा सुलिव्हन यांनी केलं आहे. अमेरिकेने आजवर जशी भूमिका बजावली तशीच महत्त्वाची भूमिका अमेरिका बजावेल, असंही सुलिव्हन म्हणाले आहेत.

दरम्यान, रशियाने युक्रेनवर सैन्य कारवाईचे आदेश दिल्यानंतर अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी आक्रमक भूमिका घेत रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले. रशियाकडून युक्रेनवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे रशियासोबत व्यवहार न करण्याचा इशारा अमेरिकेने भारत व चीनला दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक आली समोर, पाहा फोटो

“भाजपचे काही नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागत आहेत”

औरंगाबाद सेक्स व्हिडीओ प्रकरण, तृप्ती देसाईंनी थेट गृहमंत्र्यांना पाठवले व्हिडीओ

Russia-Ukraine War | ब्रिटनचे पंतप्रधान थेट युक्रेनमध्ये पोहोचले, पाहा व्हिडीओ

विद्यार्थ्यांनो लागा तयारीला; SBI मध्ये पदभरतीची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More